बीड जिल्ह्यात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात, डॉ. अनुराग पांगरीकर लसीकरणाचे पहिले मानकरी

बीडच्या जिल्हा रूग्णालयासह जिल्ह्यातील पाच ठिकाणी शनिवारी प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात झाली. दिवसभरामध्ये जिल्हाभरात ५०० जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पाच वाजेपर्यंत ३०३ जणांचे लसीकरण पूर्ण झाले होते. आयएमए संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर हे लसीकरणाचे पहिले मानकरी ठरले.

बीड जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेचा आज शुभारंभ झाला. बीडच्या जिल्हा रूग्णालयासह पाच ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. अंबाजोगाईच्या  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परळीचे उपजिल्हा रूग्णालय, गेवराईचे उपजिल्हा रूग्णालय, आष्टीचे ग्रामिण रूग्णालय या ठिकाणी लस दिली जात आहे. या मोहिमेचा शुभारंभ बीडच्या जिल्हा रूग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुर्यकांत गित्ते यांच्या उपस्थितीमध्ये झाला.

आयएमए संघटनेचे अध्यक्ष डॉ.अनुराग पांगरीकर हे लसीकरणाचे पहिले लाभार्थी ठरले. त्यांनी कोव्हिड लस घेतली. महिला प्रतिनिधी म्हणून डॉ.संजीवनी कोटेचा यांनी लस घेतली. अंबाजोगाईमध्ये आ.नमिता मुंदडा, आ. संजय दौंड, जि.प.च्या अध्यक्षा श्रीमती शिवकन्या सिरसाट यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. आष्टीमध्ये आ.बाळासाहेब आजबे, आ. सुरेश धस, यांच्या उपस्थितीमध्ये, गेवराईत आ. लक्ष्मण पवार, तहसीलदार सचिन खाडे, परळीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरूवात झाली. पाच लसीकरण वेंâद्रावर ५०० लाभार्थ्यांने लसीकरण ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.  टप्प्या टप्प्याने १५ हजार ४९२ कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३०३ जणांनी लसीकरण करून घेतले आहे. प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत करण्यात आले आहे. या मोहिमेच्या कालावधीमध्ये ८७६ कर्मचारी काम करणार आहेत. लस दिल्यानंतर अर्धातास कक्षामध्ये निरक्षण केले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या