बीड जिल्ह्यात आज 200 कोरोनाग्रस्तांची भर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी ८०४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये २०० जण कोरोना पॉझिटिव्ह आले तर ६०४ जण निगेटिव्ह आले आहेत. या २०० रूग्णांमध्ये बीड तालुक्यातील संख्या मोठी आहे.

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. शुक्रवारी ८०४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये २०० जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर ६०४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अंबाजोगाई तालुक्यात २४, आष्टी तालुक्यात २८, बीडमध्ये ६२, धारूर १३, गेवराई १५, केज १२, माजलगाव १२, परळी ८, पाटोदा ११, शिरूर ८, वडवणी ७ असे रूग्ण सापडले. बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजार ४३६ वर पोहचला आहे. यात उपचार घेत असलेले रूग्ण २४४१ एवढे आहे तर कोरोनावर मात करणाऱ्या रूग्णांची संख्या ७७०१ एवढी आहे. शुक्रवारी १९३ जणांना सुट्टी देण्यात आली. बीडमध्ये आतापर्यंत २९४ जणांचा मृत्यू झाला आहे.