बीडचे राजकारण हे प्रगल्भच, जेवढी खुन्नस तेवढाच सन्मान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

बीड जिल्ह्याचे राजकारण म्हणजे श्रेष्ठीनाही न उलगडलेलं कोडं असे नेहमीच म्हंटले जाते. जिल्ह्याचे राजकारण जेवढे खुन्नस मनात ठेऊन केले जाते तेवढेच राजकारणात एकमेकांचा सन्मान ठेवण्याचीही प्रथा आहे हे जिल्हानियोजन समितीच्या या बैठकीत पुन्हा एकदा स्पष्ट झाले. विरोधी पक्षाचे आमदार असतानाही जयदत्त क्षीरसागराना या बैठकीत मानाची खुर्ची दिली गेली यातूनच बीड जिल्ह्याची राजकीय प्रगलब्धता लक्षात येते.

पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना मोलाचा सल्ला, वाचा सविस्तर…

जयदत्त क्षीरसागर यांचा बीड जिल्ह्याच्या राजकारणातला प्रवास मोठा आणि प्रदीर्घ. सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाठी त्यांचे योगदान ही श्रेष्ठच आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सक्षमतेने निभावले होते. ते पालकमंत्री असताना त्यांनी नेहमीच विरोधी पक्षाच्या सदस्यांचा सन्मान राखला होता. हीच संस्कृती आहे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील. म्हणूनच स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. केशरकाकू क्षीरसागर, स्व. सुंदरराव सोळुंके, स्व. बाबुराव आडसकर, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते.

बीड जिल्ह्यासाठी 317 कोटींचा आराखडा तयार – पंकजा मुंडे

बीडचे राजकारण जसे खुन्नस ठेऊन केले जाते तसे एकमेकांची प्रतिष्ठा आणी सन्मान राखून ही केले जाते, स्व गोपीनाथराव मुंडे यांचा आदर्श तर डोळ्यासमोर ठेवण्यासारखाच होता. राजकारणात विरोध करणाऱ्याचेही काम ते सहज आणि सन्मानाने करत असत. विरोधक आहे म्हणून द्वेषाची वागणूक देणे स्व. मुंडे यांना कधीच जमले नाही. आजही जिल्हा नियोजन समितीच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सत्ताधारी पक्षाचे आमदार बाजूला सारत विरोधी पक्षाचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना जिल्हाधिकारी यांच्या जवळची जागा दिली गेली. एका बाजूला पंकजा मुंडे तर दुसऱ्या बाजूला जयदत्त क्षीरसागर विराजमान झाले होते.