हिवाळ्यात मेथीची भाजी खाण्याचे भरमसाठ फायदे, वाचा

हिवाळा येताच बाजारात हिरव्या पालेभाज्यांची आवक वाढते. यामध्ये पालक, शेपू, मेथी या भाज्या प्रामुख्याने दिसू लागतात. हिवाळ्यात मेथीची भाजी खाण्याचे असंख्य फायदे आहेत. मेथी ही आपल्या आरोग्यासाठी फार हितावह मानली जाते. मेथीच्या भाजीमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. म्हणूनच मेथीच्या भाजीला हिवाळ्यातील सुपरफूड मानले जाते.

हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं?

हिवाळ्यात मेथीची भाजी खाण्याचे फायदे

मेथीमध्ये भरपूर फायबर असते, यामुळे पचन सुधारते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी मेथी हा एक उत्तम पर्याय आहे. नाश्त्यासाठी मेथीचे विविध पदार्थ खाल्ल्यास दिवसभर फारशी भूक लागणार नाही. त्यामुळे अति खाणेही टाळले जाईल.

मेथीमधील फायबर आतड्यांसाठी फार गुणकारी मानले जाते. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. तसेच मेथी खाल्ल्यामुळे आम्लपित्त आणि छातीत जळजळ यांसारखी लक्षणे देखील कमी होतात. वरचेवर पित्त होणाऱ्यांसाठी मेथी ही वरदानापेक्षा कमी नाही.

हिवाळ्यात दररोज अंडी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

हिवाळ्यात शरीराला संसर्गाशी लढण्याची आवश्यकता असते. मेथीमधील व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळता येतात आणि सर्दी आणि फ्लूचा धोका कमी होतो.

मेथीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तसेच मेथीतील पोषक तत्वामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते. मेथीतील घटकांमुळे आपले केस मुळापासून मजबूत होतात. तसेच केसगळतीही मोठ्या प्रमाणात कमी होते.

उत्तम आरोग्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोणते पाणी प्यायला हवे, वाचा

मेथीतील फायबर कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे शोषण मंदावते. यामुळे रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होण्यास प्रतिबंध होतो. काही अहवाल असे सूचित करतात की, मेथी इन्सुलिन संवेदनशीलता देखील सुधारू शकते. म्हणूनच मधुमेही रुग्णांसाठी मेथी ही फार महत्त्वाची मानली जाते.

मेथी खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. हिवाळ्यात तुमच्या हृदयाची अतिरिक्त काळजी घेण्यासाठी, मेथीच्या भाजीचा आहारात समावेश करायला हवाच.