आक्षेपार्ह अवस्थेत पत्नी व भावाला पकडले, पतीची हत्या

52
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन। पाटणा

बिहारमधील कटीहारमध्ये नात्याला काळीमा फासणारी भयंकर घडली आहे. पत्नीला भावाबरोबर नको त्या अवस्थेत रंगेहात पकडणाऱ्या पतीला पत्नी व सख्ख्या भावानेच बेदम मारहाण करत त्याची हत्या केली आहे. या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर प्रमिला आणि बिजला अशी आरोपींची नावे आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रमिलाचे दिर बिजलाबरोबर अनैतिक संबंध होते. अशोकला मात्र याबद्दल काहीही माहित नव्हते. रविवारी अशोक कामानिमित्त बाहेर गेला होता. ही संधी साधत बिजलाने प्रमिलाकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याचवेळी काम लवकर आटोपल्याने अशोक वेळेआधीच घरी आला. घरात येताच प्रमिला व बिजला यांना आक्षेपार्ह अवस्थेत बघून अशोकच्या संतापाचा उद्रेक झाला. यावरून तिघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याचदरम्यान प्रमिला व बिजलाने अशोकला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यात वर्मी घाव बसल्याने अशोक खाली कोसळला. पण तरीही प्रमिला व बिजला अशोकला लाथा बुक्क्यांनी मारत होते. वेदनेने कळवळणाऱ्या अशोकची त्या दोघांनाही दया आली नाही. त्याचवेळी शेजारच्यांना संशय आला व त्यांनी अशोकच्या घराचा दरवाजा ठोठावण्यास सुरूवात केली. हे बघताच प्रमिला व बिजलाने तिथून पळ काढला. शेजारच्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता अशोक त्यांना जमिनीवर मृतावस्थेत आढळला. त्यानंतर काहीजणांनी याबद्दल पोलिसांना कळवले. नंतर पोलिसांनी प्रमिलाचा मोबाईल ट्रेस केला व २४ तासांच्या आत दोघा आरोपींना अटक केली. पोलीस चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या