
कोरोना महामारीमुळे चिंतेत असलेल्यांसाठी खुशखबर आहे. भारत बायोटेकची कोरोनवरील लस (को- व्हेक्सीन) फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता आहे. या लसीच्या संशोधनाशी संबंधित असलेल्या संशोधकाच्या हवाल्याने एका वृत्तवहिनीने हे स्पष्ट केले आहे.
भारत बायोटेकच्या लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. आतापर्यंतच्या सर्व चाचण्या सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे दिसत आहे. भारत बायोटेक सरकारच्या सहकार्याने कोरोनाच्या लसीवर संशोधन करत असून नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस बनवण्याच्या कामाला वेग देण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, ऑक्टोबरच्या तुलनेत कोरोना रुग्णांची वाढ होण्याचे प्रमाण वाढले असून दैनंदिन वाढ 50 हजाराच्या वर गेली आहे.


























































