अण्णासाहेब मोरे यांना ‘भारत गौरव’ पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकच्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांना स्वित्झर्लंडमध्ये भारत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. हिंदुस्थानी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने स्वित्झर्लंडमध्ये 20 ते 24 नोव्हेंबरला भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान, सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहारराज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते कोनफ्लुएन्स-मेक इन इंडिया एनजीओच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जाणार आहे. परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यावतीने त्यांचे पुत्र नितीन मोरे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.