भारतीय कामगार सेनेच्या ओम पॅनेलचा लार्सन अॅण्ड टुब्रोत दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लार्सन अॅण्ड टुब्रो (एल अॅण्ड टी) कंपनीच्या त्रैवार्षिक निवडणूकीत भारतीय कामगार सेनेच्या ओम पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे. भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस संदीप राऊत यांच्या नेतृत्वाखाली ओम पॅनेलने ही निवडणूक लढवली होती.

ओम पॅनेलने एल अॅण्ड टीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच या विजयाबद्दल ओम पॅनेलने भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अजित साळवी यांचे आभार मानले. यावेळी चिटणीस प्रकाश नाईक, राम साळगावकर, अरुण तोरसकर, गोविंद राणे, विजय दळवी, दिनेश जाधव यांच्यासह सुधा अंगणे आणि सर्व विजयी उमेदवार उपस्थित होते. एल अॅण्ड टीमध्ये ओम पॅनेलला दणदणीत विजय मिळाल्याने कर्मचाऱयांसह अधिकाऱयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.