
सामना प्रतिनिधी । नगर
हिंदू संस्कृतीत सणाचं महत्व अगदी खास आहे. त्यातही त्यातही भाऊबीज हा बहीण-भावाच्या पवित्र संबंधावर आधारित असा सण आहे. या निमित्त ‘भाऊबीजेचे अध्यात्मिक रहस्य’ सांगणारा एक मेसज 24 तासात जास्तीत जास्त व्हॉट्सअॅप युझर्सना पाठविण्याच्या विश्वविक्रमाचे कोचीन येथे उदघाटन कोची (केरळ) येथे उद्घाटन करण्यात आले.
जगभरात 143 देशात ध्यानधारणा शिकविणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे वर्तमानपत्र “ओम शांती मीडिया” व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नागठाणे (सातारा) यांच्यावतीने “भाऊबीजेचे अध्यात्मिक रहस्य’ संदेश जास्तीत जास्त व्हॉट्सअॅप युझर्सला पाठविण्याचा विश्वविक्रम केला जाणार आहे.
या विश्वविक्रमाचे उदघाटन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कोची सेवाकेंद्राच्या संचालिका बी के राधा दीदी यांनी कोचीन (केरळ) येथे पहिला संदेश पाठवून केले. यावेळी या विश्वविक्रमाचे संयोजक डॉ. दीपक हारके, उपस्थित होते. “भाऊबीजेचे अध्यात्मिक रहस्य’ विश्वविक्रमात सहभागी होण्यासाठी 09 नोव्हेंबर रोजी +91 95273 23286 या मोबाइलला WR असा Whatsappp वर मेसेज पाठवावा. डॉ. दीपक हारके यांचा हा 81 वा विश्वविक्रम ठरणार आहे.




























































