
अंधेरीच्या भारतीय विद्या भवन संस्थेच्या भवन्स महाविद्यालयाने आता आरोग्य क्षेत्रातही पाऊल टाकत वाटचाल सुरू केली असून मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (एमएलटी) आणि मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी (एमआयटी) या शाखांमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि काwशल्य शिकवले जाणार आहे.
एनईपी 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर भवन्सचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन (एमएचए) या मास्टर्स कोर्सची सुरुवात करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम आयट्रान्सफॉर्म ग्रुप भागीदारांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. भवन्स संस्था आणि आयट्रान्सफॉर्म ग्रुपमध्ये हा वैद्यकीय अभ्यासक्रम शिकवण्यासाठी सामंजस्य करार झाला. त्यावेळी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या आणि सध्याच्या शैक्षणिक संचालक डॉ. झरीन भाठेना, आयट्रान्सफॉर्म ग्रुपचे संस्थापक संचालक समीर जोशी आणि डॉ. सीमा जोशी, आय ट्रान्सिफॉर्म ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष समीर जोशी, भवन्स कॉलेजचे गव्हार्ंनग बॉडीचे अध्यक्ष अॅड. आसीफ मुल्ला उपस्थित होते.