BHUच्या कार्यक्रम पत्रिकेवर पाकिस्तानी कवीचा फोटो, आंदोलनानंतर उर्दू विभागाने मागितली माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
BHU

बनारस (काशी) हिंदू विश्वविद्यालयात उर्दू विभागात एक नवा वाद उभा राहिला आहे. इथे आयोजित करण्यात आलेल्या वेबीनार कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रातून BHU चे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांचा फोटो हटवून पाकिस्तानचे राष्ट्रीय कवी अल्लामा इकबाल यांचा फोटो वापरल्यानंतर वाद झाला. याची तक्रार करण्यासाठी विद्यार्थी आर्ट्स विभागाच्या डीनच्या ऑफिसमध्ये पोहोचले. त्यानंतर उर्दू विभाग बॅकफूटवर आला आणि त्यांनी तातडीने अल्लामा इकबाल यांचा फोटो काढून पंडित मदन मोहन मालवीय यांचा फोटो लावला. तसेच ट्विटर माफी देखील मागितली.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आर्ट्स विभागाच्या डीनकडून एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीसमोर उर्दू विभागाच्या अध्यक्षांना उपस्थित राहून आपला पक्ष मांडण्यास सांगितला आहे. सध्या पोस्टर बदलण्यात आले असून पंडित मालवीय यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच माफीही मागण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या दक्षतेमुळे हा बदल करण्यास यश आले आहे.