
बिहारची राजधानी पाटणाजवळील दानापूरच्या पिपापूल येथे (Peepapul) येथे शुक्रवारी भीषण दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली एक जीप गंगा नदीमध्ये कोसळली. या दुर्घटनेमध्ये 9 जणांना जलसमाधी मिळाली असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत.
जीपमध्ये 15 ते 20 प्रवाशी होते. हे सर्व अकिलपूरचे रहिवासी होते व लग्नावरून परत येत होते. या दरम्यान जीप गंगा नदीमध्ये कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफचे एक बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले असून आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे.
जेसीबीच्या सहाय्याने नदीत कोसळलेली जीप बाहेर काढण्यात आली आहे. घटनास्थळी हजारो बघ्यांची गर्दी झाली होती. तसेच दानापूरचे आमदार रितलाल यादव हे देखील पोहोचले असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक पाणबुडे आणि एनडीआरएफचे जवान यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.
Bihar: A jeep, carrying at least 15 passengers, fell into river Ganga at Peepapul in Patna today; at least 10 people missing. Search operation for the missing peole is underway. pic.twitter.com/wObcjXFYQM
— ANI (@ANI) April 23, 2021
ठेकेदारावर आरोप
दरम्यान, पिपापूलचे निर्माण ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने केल्याचाआरोप स्थानिकांनी केला आहे. पुलावरील चढामुळे गाड्या घसरतात असा आरोप नागरिकांनी केला आहे.
लग्नावरून परतताना दुर्घटना
जीपमधील सर्व प्रवाशी लग्नावरून परत येत होते. या दरम्यान पिपापूल येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रेलिंग तोडून नदीमध्ये कोसळली. गाडीच्या छतावर बसलेल्या लोकांनी उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला, मात्र गाडीत बसलेल्या 9 जणांना जलसमाधी मिळाली, तर अनेक बेपत्ता झाले आहेत.



























































