विद्यार्थीनीवर बलात्कार होताना पाहून मुख्याध्यापकही पिसाळला, त्यानेही केला अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये एका शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शाळेच्या आवारात एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार होताना पाहून मुख्यध्यापकाने तिला वाचवायचे सोडून त्याने देखील तिच्यावर अत्याचार केला. बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील रहोंदा गावात ही घटना घडली.

पीडित विद्यार्थीनी ही गावातील शाळेत आठव्या इयत्तेत शिकते. शाळा सुरू असताना ती शौचालयात गेलेली असताना तिघे गावातील तीन तरुण आले. त्यांनी तिला खेचत शाळेच्या मागच्या बाजूला नेले. तिथे त्यांनी तिच्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली. ते तिच्यावर बलात्कार करत असताना शाळेचे मुख्याध्यापक तिथे पोहोचले. त्यांनी तो प्रकार पाहिला. मात्र मुलीला वाचवायचे सोडून त्यांनी देखील मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिला तिथेच सोडून पळून गेले.

मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला. मुलगी तिच्यावर बलात्कार करणाऱ्या सर्वांना ओळखत होती. पीडित मुलीने मुख्याध्यापक व एका तरुणाविरोधात बलात्काराची तक्रार केली. तर इतर तीन तरुणांविरोधात बलात्काराला मदत केल्याची तक्रार दाखल केली. पोलीस सध्या चारही आरोपींचा शोध घेत आहेत.