महाराष्ट्रात भाजपने भाकरी 6 ठिकाणी फिरवली; आयारामांना, नव्या चेहऱ्यांना संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

भाजपने महाराष्ट्रासाठीची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. पहिली आणि दुसरी यादी मिळून राज्यातील एकूण 6 विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपने उमेदवार निवडीपूर्वी त्यांच्या कामाचा आणि लोकप्रियतेचा आढावा घेतला होता. यासाठी भाजपने खासगी सर्वेक्षण संस्थांचाही आधार घेतल्याचं सांगण्यात येत आहे. आढावा घेतल्यानंतर जे खासदार पराभवाच्या छायेत होते त्यांना बदलण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

Lok Sabha 2019 भाजपची दुसरी यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रात 4 खासदारांचे तिकीट कापले

भाजपने ज्या विद्यमान खासदारांचे पत्ते कापले आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत

  • पुणे- अनिल शिरोळे  (गिरीश बापट यांना संधी मिळाली)
  • सोलापूर -शरद बनसोडे (जयसिद्धेश्वर स्वामी यांना संधी मिळाली)
  • नगर – दिलीप गांधी ( काँग्रेसमधून आलेल्या सुजय विखेंना संधी मिळाली)
  • जळगाव – ए टी (नाना) पाटील  (स्मिता वाघ यांना संधी मिळाली)
  • दिंडोरी – हरिश्चंद्र चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या भारती पाटील यांना उमेदवारी मिळाली)
  • लातूर -सुनील गायकवाड (सुधाकर श्रृंगारे यांना संधी मिळाली)