भाजप सरकारमुळे राज्यावर कर्जाचा बोजा, अजित पवार यांची टीका

2313

भाजप सरकारमुळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. एका लग्नात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. तेव्ह काय चर्चा झाली असा प्रश्न अजित पवारांना पत्रकारांनी विचारला. तेव्हा अजित पवार म्हणाले की, ‘आमच्या खुर्च्या योगागाने बाजुला होत्या. तेव्हा हवापाण्याची चर्चा झाली. आम्ही कुणाचे कायमचे शत्रू नाही. कुठल्याही समारंभात इतर राजकीय पक्षाचे नेते भेटल्यास नमस्कार केला जातो. तेव्हा राजकीय चर्चा होत नाही’.

अजित पवार यांना बंडखोरीवर प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. तसेच ‘मी बारामतीतून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलो आहे. मला मतदारसंघाचे काम करायचे आहे. तसेच राज्यातील जनतेचेही प्रश्न सोडवायचे आहे. भाजप सराकरमुळे कर्जाच बोजा वाढला आहे. खाते वाटपाचा संपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांकडे आहे. त्याबाबत मी काही बोलू शकत नाही’, असेही अजित पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या