
काँग्रेसमधून इतर पक्षात गेलेले अनेकजण पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक आहेत. पण इतर पक्षातील अनेक जणही काँग्रेसमध्ये येण्यासाठी रांगेत आहेत असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी सांगितले.
सातारा व ठाणे जिह्यातील भाजप नेते व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सातारा जिह्यातील सहकार क्षेत्रातील नेते रणजित देशमुख व ठाणे जिह्यातील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेसच्या विचारांवर श्रद्धा असलेला व काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे राज्यभरातून अनेक नेते कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये येण्याचा ओघ वाढला आहे अनेकजण संपका&त आहे व लवकरच तेही काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.



























































