
सामना प्रतिनिधी । बीड
राष्ट्रवादी वाले अर्ज भरायला आले आणि सभा न घेता परतले म्हणे आम्हाला परवानगी नाकारली, अरे हे गडी की महिला आहेत रडी चा डाव खेळत आहेत, अशी टीका सुरेश धस यांनी केली. तसेच राष्ट्रवादी ने उमेदवारी दाखल केली की गाडी पंढरपूरला पाठवली बुक्का आणायला कारण यांना गुलाल कधीच लागलेला नाही असा निशाणाही आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेवर साधला
भाजपाच्या प्रीतम मुंडे यांच्या व्यासपीठावरून धस बोलत होते. सुरेश धस म्हणाले, “ते विरोधीपक्ष नेते नव्हे तर पक्ष विरोधी नेते आहेत, हा सुरेश धस तुम्हाला डोक्यावरचे केस उपटायला लावणार आहे, आपला नाद करायचा नाही.” असा टोला धनंजय मुंडेना लगावला.
भाऊ संस्कृती विसरला
जेव्हा मुंडे साहेब होते तेव्हा गुडघे टेकवत होता आता बहिणीवर टीकेची झोड उठवत आहात भाऊ संस्कृती विसरला. पंकजा मुंडे राजकारणात आहेत म्हणूनच बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील नेत्यांना किंमत आहे, आरोपाचे नाटक बंद करा जनता रस्त्यावर उतरू देणार नाही, असे आमदार आर टी देशमुख यांनी म्हटले.

























































