भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी पालिकेला गंडवले

66

सामना ऑनलाईन । भाईंदर

सवलतीच्या दरात पालिकेकडून भूखंड पदरात पाडून घेणारे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी पंचतारांकित सेव्हन इलेव्हन हॉस्पिटल उभे केले. मात्र ठरलेल्या करारानुसार प्रसूतिगृह तसेच प्राथमिक उपचार केंद्राचा ताबा सहा वर्षांनंतरही पालिकेला दिलेला नाही. त्यामुळे एकीकडे या रुग्णालयात येणाऱया धनाढय़ रुग्णांकडून लाखो रुपये उकळणाऱया मेहता यांनी गोरगरीब रुग्णांना या रुग्णालयाची दारेच बंद केली आहेत.

भाईंदर पूर्क येथील आरक्षण क्रमांक 217 वर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेक्हन इलेव्हन कंपनीने सुसज्ज हॉस्पिटल उभारले आहे, परंतु हे रुग्णालय उभारताना गोरगरीबांसाठी 433 चौरस मीटर इतक्या जागेवर सुसज्ज प्रसूतिगृह आणि प्राथमिक उपचार केंद्र बांधून देणे बंधनकारक होते. असे असताना नरेंद्र मेहता यांची कंपनी सुरुवातीला टाळाटाळ करत होती. याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पालिकेने मागील कर्षी ऑगस्ट महिन्यात सदर प्रसूतिगृहाची जागा आपल्या ताब्यात घेतली. यावेळी मालमत्ता कराची थकबाकी आणि दंडापोटी पालिकेने 28 लाख रुपयेही वसूल केले, परंतु जागा ताब्यात आली असली तरी प्रसूतिगृह व प्राथमिक उपचार केंद्रासाठी लागणाऱया सोयीसुविधा अद्यापपर्यंत मेहता यांनी उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्यांमधून नाइलाजाने उपचार घ्यावे लागत आहे.

आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा
मेहता यांच्या फसवेगिरीविरोधात ‘जिद्दी मराठा’ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जंगम, सत्यकाम फाऊंडेशनचे कृष्णा यांनी पालिकेसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. शिवसेनेचे मीरा-भाईंदर संपर्कप्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला असून गोरगरीबांची फसवणूक करणाऱया मेहता यांना धडा शिकवण्याचा निर्धार यावेळी केला.

आपली प्रतिक्रिया द्या