
सामना ऑनलाईन, रत्नागिरी
पेट्रोकेमिकल रिफायनरीला कोकणी जनता रस्त्यावर येऊन विरोध करत असताना नाणार रिफायनरी होणारच असे ठणकावून सांगत भाजपचे रत्नागिरी प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी नाणारवासियांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष केले आहे. आमदार प्रसाद लाड पुढे म्हणाले की, आम्ही रिफायनरी प्रकल्प करणारच, कोकणातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आणि कोकणच्या विकासासाठी रिफायनरी होणारच अशी ठाम भूमिका मांडल्याने आता नाणारवासीय त्यांना कसे उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.































































