मेरा ‘बुट’ सबसे मजबूत, भाजप आमदार खासदारामध्ये तुंबळ हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संत कबीरनगर

उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगरमध्ये भाजप नेत्यांमध्येच श्रेय नामावलीरून चांगलीच खडाजंगी झाली. दोन्ही नेत्यांनी चपलांनी, लाथाबुक्क्यांनी एकमेकांना चांगलंच धुतलं तसेच एकमेकांना शिव्यांच्या लाखोल्याही वाहिल्या. आमदार राकेश बहल आणि खासदार शरद त्रिपाठी यांच्यामध्ये ही मारहाण झाली असून याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

संतकबीरनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री आशुतोष यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक सुरू होती. या बैठकीत श्रेयनामावलीवरून आमदार राकेश बघेल आणि खासदार शरद त्रिपाटी यांच्या बाचाबाची झाली. या शाब्दिक युध्दाचे रुपांतर हाणामारीत झाले. खासदर शरद त्रिपाठी यांनी आमदार बघेल यांना सात वेळा बुटाने मारलं, तर आमदार महोदयांनी खासदारांच्या श्रीमुखात फडकावली. वेळी पोलिसांनी दोघांना रोखले. तरी दोघे ऐकण्याच्या मनस्थितीती न्हवते. दोघांनी एकमेकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिला.

एका प्रकलाच्या श्रेयनामावलीत खासदार शरद त्रिपाठी यांच्या नावाचा समावेश नव्हता. यावर खासदार महोदय चिडले. मंत्री आशुतोष टंडन यांनी दोघांना मध्यस्थीचा प्रयत्न केला परंतु दोघेही इरेला पेटले होते. बाचाबाची दरम्यान खासदारांनी आमदाराला बुटाने मारण्यास सुरूवात केली. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार आणि खासदार दोघांमध्ये वाद सुरू होते.