
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
विकास आणि प्रगतीच्या मुद्दय़ाबरोबर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेचा वापर भाजप लोकसभा निवडणुकीत करणार आहेत. त्यासाठी ‘मोदी है तो मुमकीन है!’ हे घोषवाक्य 2019 प्रचारासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दिली.
जेटली हे भाजपच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुखही आहेत. त्यांनी ‘अजेंडा 2019-पार्क-4’ या ब्लॉगवर म्हटले, कठोर निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणारे कणखर पंतप्रधान अशी प्रतिमा जनसामान्यांत मोदी यांची आहे. जगभरातील राष्ट्रप्रमुखांमध्येही हीच प्रतिमा आहे. त्यामुळे ‘मोदी है तो मुमकीन है!’ हे घोषवाक्य भाजपच्या प्रचारासाठी वापरण्यात येईल.


























































