Lok sabha 2019 सट्टा बाजारात एनडीएचीच हवा! वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जैसलमेर

राजस्थानात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने यशासह सत्ता मिळवली असली तरी आताचे देशातील देशभक्तीची लाट पाहता त्यांनी हुरळून जायचे कारण नाही, असे मत राजस्थानच्या सट्टा बाजाराने व्यक्त केले आहे. जोधपूर नजीकच्या फालोडी सट्टा बाजाराने 17 व्या लोकसभेत भाजपला 250 हून अधिक जागा मिळतील तर, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी 300 ते 310 जागा मिळवेल असे अंदाज सट्टा बाजाराने वर्तवला आहे. काँग्रेसला देशात पाहिल्याहूनही कमी जागा जिंकता येतील असाही या सट्टेबाजांचा कयास आहे.

पालोडी सट्टा बाजाराच्या अनुमानानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे देशवासीयांच्या राष्ट्रपेमाची तीव्र भावना निर्माण झाली आहे. ही भावनाच एनडीएला लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवून देण्यास कारणीभूत ठरणार आहे .सट्टा बाजाराच्या मते यंदा काँग्रेसला देशात केवळ 72 ते 74 जागांवरच समाधान मानावे लागेल. राजस्थानात 25 लोकसभा जागांपैकी 18 ते20 जागा भाजपच्या वाट्याला जातील असेही सट्टेबाजांचे मत आहे.

पाकिस्तानला धडा शिकवल्यामुळे पुन्हा एनडीएची लाट
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुलवामात दहशतवादी हल्ला करीत 40 हिंदुस्थानी जवानांचे बळी घेतले त्याचा राग सव्वाशे कोटी हिंदुस्थानींच्या मनात खडखडाट होता. कुरापतखोर पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा, असे देशातील बहुतांश नागरिकांचे आग्रही मत होते. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांवर पाकिस्तानात घुसून हवाईहल्ला करणाऱ्या जवानांबद्दल आणि या हल्ल्याचा निर्णय घेणाऱ्या एनडीए सरकारबद्दल नागरिकांना अभिमान वाटू लागला आहे. या भावनेतूनच पुन्हा एनडीएची लाट देशात जोरात वाहू लागली आहे. त्याचाच लाभ भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला होणार असे पालोडी सत्ता बाजाराच्या बुकींचे अंदाज आहेत.