राधाकृष्ण विखे पाटीलांना मंत्रिपद, राहात्यात आनंदोत्सव

सामना प्रतिनिधी । राहाता

राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद मिळाल्याने राहाता परिसरात समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटत जल्लोष साजरा केला. विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच राहाता शहरातील छत्रपती शिवाजी चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली. तसेच नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा केला.

राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने परिसरातील शेतकरी वर्गाने देखील समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील पिक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न, तसेच गोदावरी उजव्या कालव्याचे रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. राहाता शहारात विखे यांचे जंगी स्वागत व सत्कार केला जाणार असल्याची माहिती यावेळी कार्यकर्त्यांनी दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष सोपान काका सदाफळ, कैलास सदाफळ, विरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ, माजी नगरसेविका सुनीता टाक, साई निर्माण गृपचे मुन्नाभाई शहा, राहुल सदाफळ, गणेश बोरकर, प्रविन सदाफळ, विनोद कार्ले, संतोष बोरकर, सागर भुजबळ, अॅड प्रवीण गांधी, बाळासाहेब गाडेकर, सुरेश देव्हारे, पांडूरंग तुपे, डॉ. महेश गव्हाणे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या