राहुल गांधी फक्त खासदार मग संपत्तीत झपाट्याने वाढ कशी, भाजपचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करतानाच त्यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ कशी झाली असा सवाल केला आहे.

‘राहुल गांधी हे फक्त एक खासदार आहेत. त्यांच्या कमाईचे साधन फक्त त्यांचा पगार आहे. त्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही त्यांचे कमाईचे साधन नाही. 2004 ला निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची संपत्ती 55,38,123 रुपये नमूद केली होती. 2009 ला 2 कोटी तर 2014 ला त्यांची संपत्ती 9 कोटी झाली. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की त्यांची संपत्ती इतक्या झपाट्याने 55 लाखांवरून 9 कोटींपर्यंत कशी वाढली’, असा सवाल रवी शंकर प्रसाद यांनी केला आहे.