त्यांना बोंबलू द्या, भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षांचा तोल गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरत काळे । जळगाव

निधी वाटप समप्रमाणात होणार नाही, त्यांना बोंबलू द्या, असे जळगाव जिल्हा परिषदेच्या भाजपच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी स्वपक्षाच्या सदस्यांना म्हटल्याने जिल्हा परिषद सभागृहात एकच गोंधळ उडाला आहे.

जळगाव जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद सभागृहात सुरू आहे. समान निधी वाटपावरून सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपचे गटनेते पोपट भोळे यांची सदस्यांची समजूत काढताना चांगलीच दमछाक झाली आहे. आमच्यावर तुम्ही अन्याय करत आहात असा आरोप ही भाजपच्या सदस्यांनी आपल्याच पदाधिकाऱ्यावर केला आहे. समान निधी वाटप झालेच पाहिजे अशा घोषणा सदस्यांनी दिल्या आहेत. सदस्यांची आक्रमक धोरण पाहून मागच्या सभेतील निधी वाटपाचे विषय नामंजूर करण्यात आले आहेत.