
नॅशनल इन्शुरन्स स्थानीय लोकाधिकार समिती आणि स्व. मीनाताई ठाकरे रक्तपेढी प्रबोधन-गोरेगाव यांच्या विद्यमाने आज बुधवार, 28 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नॅशनल इन्शुरन्स स्थानीय लोकाधिकार समितीच्या कार्यालयात हे रक्तदान शिबीर पार पडणार आहे. शिवसेना नेते स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष-खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना नेते सचिव, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे कार्याध्यक्ष आनंदराव अडसूळ, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, नगरसेवक मिलिंद वैद्य, नॅशनल इन्शुरन्सचे एस. के. सिंग, राज गोपालन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.



























































