याकूबच्या थडग्याशी पालिकेचा संबंध नाही, सी वॉर्ड आयुक्तांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत सहभागी याकूब मेमन याच्या मरिन लाईन्स येथील बडा कब्रिस्तानमध्ये थडग्याशी काही संबंध नाही. बडा कब्रिस्तान ही खासगी ट्रस्टची जागा असून पालिकेचा या जागेशी संबंध नाही. महापालिका फक्त मृत्यू दाखला आणि दफन करण्यासाठीची परवानगी देते. त्यामुळे इतर कुठल्याही प्रकारची परवानगी देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, अशी माहिती पालिकेच्या सी वॉर्डचे साहायक आयुक्त किशोर येरमे यांनी दिली.

मुंबईत अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमने 1993 मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. या बॉम्बस्फोट मालिकेत याकूब मेमनचा हात असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याला फाशीची फाशी देण्यात आली. फाशी दिल्यानंतर मेमन याचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. कुटुंबीयांनी मरिन लाईन्स येथील खासगी ट्रस्टच्या मालकीची बडा कब्रिस्तानमध्ये याकूब मेमन याला दफन केले. मात्र याकूब याच्या थडग्यावर विद्युत रोषणाई व सुशोभीकरण करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आणि राजकीय वातावरण पेटले.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा संबंध नाही
बडा कबस्तानची जागा ही खासगी जागा असून जिल्हाधिकारी कार्यालयाचा या जागेशी संबंध नाही, असे स्पष्टीकरण शहर जिल्हाधिकारी राजीव निवेतकर यांनी दिले आहे.