सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने पुरवा

321

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सफाई कामगार एखाद्या सैनिकाप्रमाणे जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे या सफाई कामगारांची सुरक्षा आणि त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांना आवश्यक ती सर्व साधने पुरवावीत अशा सूचना राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष मुकेश सारवान यांनी मुख्य सचिव आणि राज्यातील महापालिका, नगरपालिकांना, एसटी महामंडळ, रुग्णालयांना दिल्या आहेत.

हे सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून शहरांमध्ये साफसफाई करीत आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असतानाही त्यांना सुरक्षेसाठी साधने पुरविण्यात आली नसल्याची बाब राज्य सफाई कामगार आयोगाच्या निदर्शनास आली आहे असे त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या