
सामना प्रतिनिधी । मुंबई
देशविदेशातील पर्यटक आणि मुंबईकरांची आकर्षण असणारी जुहू चौपाटी आता ‘बीच क्लीनिंग’ मशीनच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने तीन अत्याधुनिक मशीन्स घेतल्या असून या मशीन्स सहा इंच खोल रेतीमधील कचराही उचलणार आहेत. त्यामुळे जुहू चौपाटीवर आता कचरा दिसणार नाही.
चौपाटीच्या स्वच्छतेसाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत स्थानिक रहिवाशांच्या सूचनांचा समावेश करून काम सुरू करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. यामध्ये पाकसाळ्याचे चार महिने आणि उर्वरित आठ महिन्यांसाठी स्वतंत्र योजनेद्वारे उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापनचे उपायुक्त विश्वास शंकरकार यांनी दिली. जुहू चौपाटीची लांबी ही सुमारे सहा किलोमीटर असून रुंदीही सरासरी ६० मीटर एकढी आहे. यानुसार जुहू चौपाटीचे क्षेत्रफळ सुमारे ३ लाख ६० हजार चौरस मीटर एकढे आहे.
१२० कामगार तैनात
महापालिकेच्या ‘के’ पश्चिम किभागांतर्गत येणाऱया जुहू चौपाटीकर पाकसाळ्यात दररोज सरासरी १२५ मेट्रिक टन कचऱ्याची सफाई केली जाते तर पाकसाळ्याक्यतिरिक्त आठ महिन्यांत ही सरासरी दररोज सुमारे २० मेट्रिक टन एकढी असते. यानुसार पाकसाळ्यात दररोज किमान १२० कामगार तर उर्करित आठ महिन्यांत दररोज ६० कामगार चौपाटीची स्वच्छता करतील. ‘स्पेक्ट्रम इंजिनीअर्स प्रा. लि.’ कंपनीला हे काम सहा वर्षांसाठी देण्यात आले असून यासाठी पालिका २३.६४ कोटी खर्च करणार आहे.
असे होणार काम
- दर तासाला २० हजार चौरस मीटर जागेची साफसफाई तीन अत्याधुनिक ‘बीच क्लीनिंग मशीन’च्या सहाय्याने करण्यात येतील.
- याशिवाय २ कॉम्पॅक्टर, २ ट्रक्टरसह लागणारी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ कंत्राटदाराला बंधनकारक करण्यात आले आहे.
- ‘बीच क्लींनिंग मशीन’ ट्रक्टरच्या सहाय्याने चौपाटीकरील परिसरात नियमित स्करूपात कापरले जाईल. या मशीनच्या खाली असणारी सुमारे सहा इंच लांबीची कैशिष्टय़पूर्ण पाती ही काळूच्या खाली जाऊन छोटा कचराही बाहेर काढतात.
- यामध्ये सुमारे सहा इंचांपर्यंतची काळू वारंवार करखाली केल्यामुळे चौपाटीकरील वाळूचा थर मऊशार क भुसभुशीत राहण्यासही मदत होत आहेत.




























































