पश्चिम उपनगरातील आठ पूल पालिका नव्याने बांधणार, 27 कोटींचा खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक आढळलेल्या पुलांमधील पश्चिम उपनगरातील पाच पूल तोडून नव्याने बांधण्यात येणार आहेत. यासाठी पालिका 27 कोटी रुपये खर्च करणार असून यात कांदिवलीतील तीन आणि गोरेगाव-मालाडमधील प्रत्येकी एका पुलाचा समावेश आहे. पालिकेने हिमालय पूल दुर्घटनेनंतर नव्याने केलेल्या सर्वेक्षणात एकूण 15 धोकादायक पूल वाढले असून एकूण धोकादायक पुलांची संख्या 21 वर गेली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी पूल कोसळल्यामुळे पालिकेने सर्व पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पश्चिम व पूर्व उपनगरातील अनुक्रमे 157 व 66 पुलांचे ऑडिट करण्यात आले आहे. नव्या ऑडिटनुसार नव्याने बांधण्यात येणार्‍या गोरेगाव ते कांदिवलीमधील पाडण्यात येणार्‍या सहा पुलांचे बांधकाम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. या पुलांचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करण्याची अट कंत्राटदाराला घालण्यात आली आहे. दरम्यान, आगामी काळात धोकादायक आढळलले गोरेगाव-दहिसरमधील सहा पूल पाडले जाणार आहेत. 

पश्चिम उपनगरातील धोकादायक पूल

  • हंस भुग्रा मार्ग
  • पाइपलाइन सर्व्हिस रोड
  • वालभाट नाला
  • विठ्ठल मंदिर इराणीवाडी
  • रगडापाडा पूल
  • एस. व्ही. पी. रोड कृष्णकुंज पूल
  • आकुर्ली रोड, हनुमान नगर पूल
  • ओशिवरा नाला
  • एस. व्ही. रोड पूल
  • पिरामल नाला लिंक रोड
  • एसबीआय कॉलनी पूल
  • रतन नगर ते दौलत नगर पूल

हे पूल नव्याने बांधणार

  1. विठ्ठल मंदिर इराणीवाडी, कांदिवली
  2. एसव्हीपी नगर रोड कृष्णकुंज, कांदिवली
  3. आकुर्ली रोड, कांदिवली
  4. वालभाट नाला, गोरेगाव
  5. एस. व्ही. रोड बाटा शोरूम, मालाड