
बॉबल एआय या युजर्सना उच्च सर्वसमावेशक स्मार्टफोन की बोर्ड सोल्यूशन्स व वैयक्तिकृत कंटेंट देणाऱया आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअपने की बोर्डवर ‘कोविड 19 रिसोर्सेस’ नावाचा विभाग सादर केला आहे. यामध्ये देशभरातील माहिती देणाऱया विश्वसनीय रिअल-टाइम लिंक्स आहेत. या लिंक्सचा वापर करून ऑक्सिजन सिलिंडर्स, कॉन्सन्ट्रेटर्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, प्लाझ्मा दाता यासंबंधी टेलिफोन क्रमांक व पत्त्यांची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
ही माहिती कोविडसंबंधित की वर्ड्सवर आधारित सरकारी स्रोत व ट्विट्समधून रिअल-टाइममध्ये मिळवण्यात आली आहे. सर्व बॉबल युजर्स इतरांसोबत लिंक्स शेअर करू शकतात. कोरोना महामारीच्या संकटात जाणवणारा वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा आणि त्याची उपलब्धता याची माहिती लोकांना होण्यास या उपक्रमाची खूपच मदत होईल, असे बॉबल एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित प्रसाद म्हणाले.


























































