
सामना प्रतिनिधी । परभणी
शहरातील खानापूर ते पिंगळी रस्त्यावर सुरू असलेल्या बनावट खत व औषधींच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सायंकाळी छापा टाकला. यात मोठ्या प्रमाणात बनावट खत व औषधी बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
परभणी तालुक्यातील पिंगळी रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. छापा टाकला तेव्हा रिकाम्या बॉटल्स, मोठे कंटेनर, बनावट केमिकल, विविध कंपन्यांचे रॅपर, स्टिकर्स, प्लास्टीक, मोठ-मोठे बॉक्स या ठिकाणी आढळून आले. तसेच पॅकिंग करण्याचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. कृषी अधिकाऱ्यांमार्पâत या बनावट खत, औषधींची मोजणी सुरू असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.































































