वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातून मुलगा बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना नियंत्रणात आल्यामुळे 1 नोव्हेंबरपासून भायखळ्याचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून शेकडो पर्यटक उद्यानाला भेट देत आहेत. मात्र, आज डोंबिवलीतून कुटुंबीयांबरोबर आलेला 7 वर्षांचा मुलगा उद्यानातून बेपत्ता झाला. या प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी डोंबिवलीचे संदीपकुमार राणा आपला पुतण्या आरवसह दुपारी साडेबाराला आले होते. मात्र, काही वेळाने 7 वर्षीय आरव विनोद राणा हा बेपत्ता झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.