9 बायकांशी लग्न करणारा 4 जणींना घटस्फोट देण्याच्या तयारीत

9 बायकांशी लग्न केल्याने प्रसिद्ध झालेल्या ब्राझिलियन मॉडेलने 4 बायकांशी घटस्फोट घेण्याचा विचार केला आहे. 9 बायकांशी लग्न केल्याने आर्थर उर्सो हा ब्राझिलियन मॉडेल प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मात्र आता या मॉडेलने 4 बायकांशी घटस्फोट घेण्याचा विचार केल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. असे असले तरी देखील त्याने भविष्यात आणखी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्यावर सार्वजनिक दबाव असल्याने घटस्फोट जाहीर करत आहोत असे आर्थरने म्हटले आहे.

‘मुक्त प्रेम साजरे करण्यासाठी’ आणि ‘एकपत्नीत्वाचा निषेध’ करण्यासाठी आर्थरने लुआना कझाकी या पहिल्या पत्नीसह आठ इतर स्त्रियांशी चर्चमध्ये लग्न केले. मात्र ब्राझीलमध्ये बहुपत्नीत्व बेकायदेशीर असल्याने त्याला 9 पत्नींशी नाते ठेवणे कठीण जात होते. त्यामुळे अखेर त्याने 4 पत्नींशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.