
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामात दुर्घटनांची मालिका सुरू आहे. सिन्नर ते घोटी दरम्यानचे काम प्रगतीपथावर पथावर असताना इगतपुरी तालुक्यात महामार्गवर पूल कोसळण्याची दुर्घटना घडली. मात्र वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे समुद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
इगतपुरीत समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून महामार्गावरून जाणारा बेलगाव तऱ्हाळे आणि गांगडवाडी या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी हे काम सुरू आहे. त्या परिसरात सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पूल कोसळण्याची दुर्घटना घडली. पुलाचा जवळपास 200 ते 250 मीटरचा भाग समृद्धी महामार्गावर कोसळला.
पूल किंवा पुलाचा कोणताही भाग कोसळलेला नाही. तर पुलाच्या कामांतर्गत बांधकामासाठीचे गर्डर क्रेनने वरती चढवले जात असताना क्रेनला धक्का लागला. त्यामुळे गर्डर खाली पडले.
– अनिलकुमार गायकवाड,सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी
एप्रिल 2022 मध्ये नागपूर ते शेलू बाजारदरम्यान उन्नत मार्गाचा भाग कोसळला.
एप्रिल2022 मध्येच सिंदखेड राजा येथे टप्पा 7 मध्ये व्हायडकच्या ठिकाणी व्रेनच्या साहाय्याने गर्डर उचलताना जॅक घसरले आणि गर्डर कोसळला.
ऑगस्ट 2022 मध्ये वाशीम येथील मालेगावदरम्यान उन्नत मार्गिकेच्या कामासाठी उन्नत मार्गावर क्रेन कलंडली आणि गर्डर जमिनीवर कोसळले.



























































