
बेसन आणि दही यांचे मिश्रण त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पण चेहऱ्यावर बेसन आणि दही योग्य पद्धतीने कसं लावायचं ते जाणून घ्या. ह्या उपायाने त्वचा चमकदार बनते.
बेसन आणि दही चेहऱ्यावर कसं लावायचं?
बेसन खाण्यापासून ते त्वचा आणि केसांपर्यंत वापरलं जातं. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी अनेक शतकांपासून बेसनाचा वापर केला जात आहे. बेसनामध्ये अनेक पोषक घटक असतात.बेसन त्वचेची जळजळ कमी करते, जंतूंच्या वाढीस प्रतिबंध करते शिवाय यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. बेसन त्वचेवरील डाग दूर करणे, मुरुम दूर करणे आणि त्वचेचा रंग सुधारण्याचे कार्य करते. बेसन चेहऱ्याचा रंग सुधारते आणि त्वचा चमकदार बनवते. अनेक लोक बेसनाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे चेहऱ्यावर करतात. काहीजण बेसनाचं पीठ पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावतात, तर अनेकजण बेसनाचे पीठ दुधात मिसळून चेहऱ्यावर लावतात. याशिवाय बेसनात मिसळलेलं दहीही चेहऱ्यावर लावू शकता. होय, बेसन आणि दही यांचे मिश्रण त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. दह्यात जीवनसत्त्वे, लॅक्टिक ॲक्सिड आणि प्रोबायोटिक्स असतात.दही त्वचेला खोलवर स्वच्छ करतं आणि त्वचेला पोषण देखील देते. बेसन आणि दही एकत्र लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. आता प्रश्न पडतो चेहरा चमकण्यासाठी बेसन आणि दही कसं लावायचं?
बेसन आणि दही मिसळून हळद लावावी
हळद अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, एंटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. बेसन, दही आणि हळद एकत्र करून चेहऱ्याला लावू शकता. यासाठी 2 चमचे बेसनामध्ये 2 चमचे दही आणि चिमूटभर हळद मिसळा. ते चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या. यानंतर, गोलाकार पद्धतीने स्क्रब करा. नंतर साध्या पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या त्वचेवरील डाग आणि पिंपल्स दूर होतील. हे लावल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
बेसन आणि दह्यात लिंबू मिसळा
जर तुम्ही चेहरा काळवंडण्याच्या किंवा टॅनिंगच्या समस्येने त्रस्त असाल तर बेसन, दही आणि लिंबू एकत्र करून लावा. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड असते, जे चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करते. लिंबू देखील रंग उजळवण्याचे काम करते. यासाठी 2 चमचे बेसनामध्ये 2 चमचे दही आणि लिंबाचा रस मिसळा. चेहऱ्याला लावा. 20 मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हे केल्याने त्वचेच्या मृत पेशी स्वच्छ होतील आणि त्वचा चमकदार होईल.
बेसन आणि दह्यात मध मिसळा
मध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून होतो. याशिवाय मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आढळतात, जे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात मदत करतात. तुम्ही बेसन, दही आणि मध मिक्स करून चेहऱ्याला लावू शकता. यासाठी एका भांड्यात 2 चमचे बेसन, 2 चमचे दही आणि एक चमचा मध एकत्र करून घ्या. ते चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा दूर होण्यास मदत होईल. यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सची समस्याही दूर होईल. याच्या नियमित वापराने तुमची त्वचा चमकदार होईल.





























































