रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ सापडले ब्राऊन हेरॉईन, तिघेजण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमली पदार्थांची रत्नागिरीत खरेदी-विक्री होत असल्याची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. रेल्वे स्थानकाच्या पार्सल गेटवरून पार्ंकगकडे जाणाऱया रस्त्यावर तीन इसमांच्या संशयास्पद हालचाली गस्त घालणाऱया पोलिसांना दिसून आल्या. या तिघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे 21.78 ग्रॅम ब्राऊन  हेरॉईन हा अमलीसदृश पदार्थ आढळून आला. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी रात्री केली.

मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिह्यात काही इसम अमली पदार्थाची खरेदी-विक्री करत आहेत, अशी माहिती मिळत होती. त्या अनुषंगाने रत्नागिरी शहरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याची सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग  सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी-अंमलदार यांना देण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे रोज निहाय अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱयांबाबत गोपनीय माहिती प्राप्त करण्याचे काम चालू होते.

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे,  प्रसाद घोसाळे, गणेश सावंत, प्रवीण बर्गे, अमोल भोसले, आशिष भालेकर, विनय मनवल, रत्नकांत शिंदे व पंकज पडेलकर यांनी केली.