
या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारसाठी मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पाटणा विमानतळ, आयआयटी, मखाना बोर्डची घोषणा करण्यात आली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात बिहारसाठी सात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
- बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना केली जाईल. या बोर्डाच्या माध्यमातून मखाना व्यवसाय सुलभ केला जाईल तसेच मखाना उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
- पाटणा आयआयटीचा विस्तार केला जाईल, तसेच पाटणा आयआयटीची जागाही वाढवल्या जातील.
- बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था सुरू केली जाईल.
- अर्थसंकल्पात पश्चिम कोसी कालव्यासाठी निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तयामुळे दरभंगा आणि मधुबनी भागात पाणी मिळेल.
- पाटण्यातील बिहटा विमातळाचा विस्तार केला जाईल, सध्या या विमानतळाचे काम सुरू आहे.
- बिहारची राजधानी पाटण्याच्या विमानतळाचा विस्तार केला जाईल तसेच आणखी आधुनिक सेवाही दिल्या जातील.
- बिहारमध्ये तीन नवीन ग्रीन फिल्ड एअरपोर्टची घोषणा करण्यात आली आहे. भागलपूर, रागगीर आणि सोनपूरमध्ये हे विमानतळ बनवले जातील.





























































