अमृतकाळातील नव्हे, मित्रकाळातील अर्थसंकल्प; विरोधकांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प असल्याचा उल्लेख केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अर्थसंकल्पावर बोलताना अमृतकाळाचा उल्लेख करत हा अर्थसंकल्प देशाची स्वप्ने पूर्ण करेल असे म्हटले होते. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. आजचा अर्थसंकल्प अमृतकाळातील नव्हे तर मित्रकाळातील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अर्थसंकल्पात रोजगार निर्माण करण्याची तरतूद नाही, देशाचे भविष्य घडवण्याचा रोडमॅप नसल्याची टीका केली आहे. हिंदुस्थानातील एक टक्के सर्वात श्रीमंत लोकांकडे देशाची 40 टक्के संपत्ती आहे, देशातील 50 टक्के गरीब एकूण 64 टक्के जीएसटी भरतात, तर देशातील 42 टक्के तरुण बेरोजगार आहेत तरीही पंतप्रधानांना त्याची काळजी नाही असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

–  राहुल गांधी,  काँग्रेस नेते

संधीसाधू सरकारचे बजेट

आजचे बजेट हे संधीसाधू सरकारचे बजेट असून जनताविरोधी आहे. बजेटमध्ये गोरगरीबांना वंचित ठेवलेले आहे. हा पेंद्रीय अर्थसंकल्प भविष्यवादी नाही, पूर्णतः संधीसाधू आणि गरिबांविरोधी आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून तयार करण्यात आला हा अर्थसंकल्प आहे.

–  ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

दिल्लीला पुन्हा सावत्र वागणूक

दिल्लीकरांनी 1.75 लाख कोटींहून अधिक प्राप्तिकर भरूनही दिल्लीसाठी केवळ 325 कोटींची तरतूद केली आहे. पेंद्राने देशाच्या राजधानीला सावत्र आईची वागणूक दिली आहे. अर्थसंकल्पाने महागाई आणि बेरोजगारीबाबत दिलासादायक काहीही नाही. शैक्षणिक बजेट 2.64 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांपर्यंत कमी करणे दुर्दैवी आहे. आरोग्य बजेट 2.2 टक्क्यांवरून 1.98 टक्के करणे हे धोकादायक आहे.

– अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली  

निवडणुका समोर ठेवून केलेले बजेट

मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा काही राज्यांमध्ये होणाऱया निवडणुका समोर ठेवून सादर करण्यात आला आहे. गरीब लोकांसाठी या अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद नाही. बेरोजगारीवर काहीही बोललेले नाही. रिक्त सरकारी पदे, मनरेगा याबाबत चकार शब्द काढलेला नाही. महागाईवरील नियंत्रणासाठी कोणतीही तरतूद नाही.

– मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते

रोजगाराबाबत काहीही नाही

ग्रामीण भागातील मजूर, रोजगार आणि महागाई कमी करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. अर्थसंकल्पातीला काही किरकोळ सुधारणा सोडल्या तर त्यात काही नाही. अशा निराशाजनक अर्थसंकल्पामुळे काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांची उत्तरे सरकारने देणे भाग आहे.

– शशी थरूर, काँग्रेस नेते

पायाभूत सुविधांवर भर देणारा

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थसंकल्प खूप चांगला आहे. त्यामुळे आगामी काळात हिंदुस्थानात जागतिक दर्जाचे रस्ते तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू. ‘ग्रीन एनर्जी’, ‘ग्रीन पॉवर’ असा सर्वच ठिकाणी जो ‘ग्रीन’ उल्लेख झाला, हे पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

– नितीन गडकरी, पेंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री

भूतकाळात नेणारा अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात वस्तुनिष्ठ दृष्टिकोन नाही. सरकारने केवळ भूतकाळातील घटनांचा आढावा घेऊन अर्थसंकल्प मांडला आहे. त्यात भविष्यकालीन तरतूद काहीच नाही. गेल्या वर्षी काय झाले, गेल्या 5 वर्षांत काय झाले हे पाहणे गरजेचे आहे. परंतु भविष्यात आपण काय करायला पाहिजे, हे यातून काहीही कळत नाही.

– पी. चिदंबरम, माजी अर्थमंत्री

केंद्राने बिहारला फसवले

बिहार राज्याला केंद्र आणि अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत आणि आमच्या काय समस्या आहेत हे आम्ही पेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना आगाऊ कळवले होते. मात्र या अर्थसंकल्पात बिहारच्या विकासाला गती देईल, असे काहीही मिळालेले नाही. बिहारी लोकांच्याही अर्थसंकल्पातून खूप काही अपेक्षा होत्या, मात्र पेंद्र सरकारने बिहारला सपशेल फसवले आहे.

– विजय कुमार चौधरी, अर्थमंत्री, बिहार