
सामना प्रतिनिधी। धामणगाव बढे (जि.बुलढाणा)
आगामी काळामध्ये शेतकरी शेतमजुरांसहीत सर्वांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार असून त्यावर मात करण्यासाठी सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचावे असे आवाहन माजी आमदार विजयराज शिंदे यांनी धामणगाव बढे येथे आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज केले.
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे स्थानिक मंगलकार्यालयात धामणगाव बढे मंडळातील कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विजयराज शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. ८० टक्के समाजकारण हा शिवसेनेचा धर्म असून कर्तृत्वाने, कार्याने, वागणुकीने माणूस मोठा होतो. नाव हे कामामुळेच कायम राहते, त्यामुळे सर्वसामान्याच्या सेवेसाठी अहोरात्र काम करा असे आवाहन केले. पदावर असो अथवा नसो आपण सतत समाजामधील सर्व घटनांना न्याय देवून त्यांची कामे करण्याचा प्रयत्न केला व करत राहू. शिवसेना हा समाज उद्धारणाचा मूल मंत्र असून त्यावर आपण सतत कार्यरत राहू असेही प्रतिपादन त्यांनी केले. शासनाने प्रत्येक घटकामधील बांधकाम कामगारांसाठी त्यांच्या कल्याणासाठी बांधकाम कामगार योजना कार्यान्वीत केली असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांनी सर्व चांगल्या योजना तळागाळापर्यंत पोहचवाव्यात असेही आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन कुर्हाडे यांनी, सुत्रसंचलन गणेश झंवर यांनी तर आभार गणेश वैराळकर यांनी मानले. या कार्यक्रमाला शिव वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष संजय हाडे, कृष्णा भोरे, अर्जुन दांडगे, प्रकाश देशलहरा, राजु मोदे, राजु खर्चे, भागवत दराखे, सुगन निंबोळकर, बंडू जयस्वाल, भागवत चव्हाण, राजु सुरपाटणे, राजु भुसारी, मुसा ठेकेदार, विश्वनाथ इंगळे, अरुण राऊत, अरुण टेकाडे, प्रविण लवंगे, सुखदेव शिवलकर, सिताराम गाडे, चंद्रभान पाटील, सचिन शेळके, हारुण पटेल, पुरुषोत्तम लखोटीया, ओमसिंग राजपूत, विठ्ठल येवले, यांचेसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पिंपळगाव देवी येथील अशोक एकनाथ पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.

































































