
बुल्लीबाई ऍपचा निर्माता निरज बिष्णोईला दिल्लीतील सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. एखाद्या समाजातील महिलांना सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर अपमानित करणे हा गुन्हा वाटतो तेवढा साधा नाही. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होते. असा गुन्हा करणारा व्यक्ती कोणीही असली तरी त्याला जामीन मिळवण्याचा अधिकार नाही, असे परखड मत न्यायमूर्ती धमेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त करत बिष्णोईचा जामीनअर्ज फेटाळून लावला आहे. निरज बिष्णोई हा 21 वर्षांचा तरुण असून त्याला दिल्ली पोलिसांनी आसाम येथून अटक केली आहे. मुस्लिम महिलांचा लिलाव करण्याच्या हेतूने निरजने बुल्लीबाई ऍपवर त्यांचे फोटो अपलोड केले होते. त्यामुळे देशभर खळबळ उडाली होती.


























































