
छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय विमानतळ परिसरात गुन्हेगारी वृत्तीच्या चालकांची (टाऊटस) गुंडगिरी वाढू लागली आहे. विमानतळावर येणाऱया प्रवाशांची ते सर्रास फसवणूक करत असून सुरक्षा यंत्रणांनी अटकाव केल्यास ते दादागिरी करत असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी काही टाऊटसने सेक्युर 1 या सुरक्षा सर्व्हिसेस पंपनीच्या एका सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय विमानतळ परिसरात काही गुन्हेगारी वृत्तीच्या चालकांचा राबता असतो. देशीविदेशी प्रवाशांची दिशाभूल करून त्यांची ते शिताफीने आर्थिक फसवणूक करतात. याची गंभीर दखल घेत सहार पोलिसांनी गुंड प्रवृत्तीच्या चालकांचे पंबरडे मोडले. परिणामी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून त्या टाऊटसनी काढता पाय घेतला. त्यांनी आता आंतरदेशीय विमानतळ परिसरात दादागिरी व प्रवाशांची लुटमार करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी असे करण्यापासून त्यांना विमानतळ परिसरात सुरक्षेचे काम पाहणाऱया सेक्युर 1 या सुरक्षा पंपनीच्या आकाश गुत्तेदार या रक्षकाने रोखले असता चारपाच जणांनी मिळून त्यांना शिवीगाळ केली. इतकेच नाही तर धक्काबुक्की करत मारहाणदेखील केली. याशिवाय काही टाऊटस सीआयएसएफच्या जवानांशीदेखील हुज्जत घालतात. अशा प्रकारे टाऊटसचा मनमानी कारभार चालू असून त्यांची दादागिरी दिवसागणिक वाढूच लागली आहे. गुंडगिरी करून उलट तेच सुरक्षा रक्षकांविरोधात पोलिसांत खोटी तक्रार देण्यासाठी धावतात, असे चित्र असल्याचे काही चालकांनी सांगितले. दहा टाऊटसविरोधात गुन्हे तसेच अदखलपात्र गुह्यांचीदेखील नोंद आहे. अशा टाऊटसमुळे इमानदारीने काम करणाऱया अन्य चालकांनादेखील त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
टाऊटसचा बंदोबस्त करा; पोलिसांना पत्र
अशा गुन्हेगारी वृत्तीच्या टाऊटसवर कायदेशी कठोर कारवाई करावी असे लेखी पत्र पोलिसांना दिले असल्याचे सेक्युर 1 चे अश्विन मोरे यांनी सांगितले. तसेच अदानी समूहाच्या वतीनेदेखील टाऊटसविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून प्रवाशांची फसवणूक होणार नाही आणि त्यांना सुरक्षित वातावरणात ये-जा करता येईल असे लेखी पत्र स्थानिक पोलिसांना दिले आहे.


























































