
अवघ्या पाच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या बुंदेलखंड एक्सप्रेस वेचा रस्ता खचला आहे. बुधवारी या खड्ड्यात पडल्याने एका गाडीला अपघात देखील झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जुलै रोजी जालौन येथील कैथेरी गावात बुंदेलखंड एक्सप्रेस वेचं उद्घाटन केलं होतं. उद्धाटनाच्या पाच दिवसातच जालौन येथील छिरिया सलेमपूर येथे हा रस्ता खचला आहे. बुधवारी या खड्ड्यात पडल्याने एक गाडी आणि बाईक अपघातग्रस्त झाल्या. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. याच रस्त्यावर गेल्या पाच दिवसांत चार अपघात झाले आहेत.
बुंदेलखंड एक्सप्रेसवे का एक हिस्सा धंस गया.
सिर्फ 4 दिन पहले PM ने उद्घाटन किया था. pic.twitter.com/eBBuMOcIiT
— Ranvijay Singh (@ranvijaylive) July 21, 2022
व्हायरल व्हिडीओमुळे एकच गहजब झाला आहे. या व्हिडीओची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर वादंग उठलं आहे. मोदी सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुंदेलखंड एक्सप्रेस वेचं उद्घाटन खुद्द पंतप्रधानांनी केलं होतं. पण, या प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हा एक्सप्रेस वे 28 महिन्यांमध्ये तयार झाला. उत्तर प्रदेश सरकारच्या म्हणण्यानुसार, या एक्सप्रेस वेला बनवणाऱ्या कंत्राटदाराने सरकारचे 1132 कोटी रुपये वाचवले होते.


























































