
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी शहरात बस स्थानकात उभ्या बसमधील इंजिनला अचानक आग लागल्याने चालकाची केबिन जळून खाक झाली, दुसऱ्या घटनेत जिंतूर-परभणी प्रवासादरम्यान तालुक्यातील झरी जवळ बसच्या मागील टायरचे संपूर्ण रिमोल्ड निघाल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर बसवर ताबा घेत प्रसंगावधान होऊन प्रवाशांना सुरक्षीत उतरून त्यांचे प्राण वाचविले. सुदैवाने या दोन्ही घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.
बीडहुन किनवटकडे जाणारी एमएच 20 बी.एल. 1906 या क्रमांकाची बस आज सकाळी 8.30 च्या सुमारास परभणी बस स्थानकात दाखल झाली. यावेळी यावेळी आतील प्रवासी उतरत होते तर खाली उभे असलेले प्रवासी बस मधील प्रवासाच्या उतरण्याची वाट पाहत होते. तर चालक व वाहक बसमधून खाली उतरले. त्याचवेळी अचानक चालकाच्या केबिनमधून धूर येऊ लागला. काही प्रवाशांच्या लक्षात ही बाब येताच आरडा ओरड सुरू झाली. त्याच वेळी केबिनमधील इजिनने पेट घेतला. त्यामुळे गोंधळ करीत वेगाने प्रवासी बस मधून उतरले. बस स्थानकात आग विझवणारी यंत्रणा तात्काळ उपलब्ध नसल्याने मनपाच्या अग्निशमन दलाच्या बंबास पाचारण करण्यात आले. काही क्षणातच हा बंब बस स्थानकात दाखल झाला. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. तो पर्यंत चालकाची केबिन जळून खाक झाली होती.
चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले 53 प्रवाशांचे प्राण
जिंतूर आगाराची बस (एम.एच. 40 एन. 9850) नेहमीप्रमाणे 6 वाजता 3 फेऱ्या जिंतूर-परभणीचा प्रवास करत असताना निघाली होती. परंतु परभणीहून पुढे झरी जवळ बस आल्यानंतर बसच्या मागच्या चाकात मागील बाजूच्या टायरचे संपूर्ण रिमोल्ड निघाल्याचे चालक एच.डी. घुगे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बसचे ब्रेक दाबून गाडी उभी केली. प्रवाशांना दुसऱ्या गाड्यांनी बसून सुखरूप बसून दिले जर हा प्रसंग चालकाच्या लक्षात आला नसता तर काही वेळातच टायर फुटून दुर्घटन घडून प्रवाशांच्या जीवाशी इजा होण्याची शक्यता होती. तसेच यावेळी वाहक त्रिभुवन यांनी मोलाचे सहकार्य केले.




























































