उद्योगिनी प्रतिष्ठानच्या वतीने बिझनेस एक्स्चेंज पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्स्चेंज पुरस्कार उद्योजकांना प्रदान करण्यात येणार आहे. सोहळा दादर पूर्व येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात शनिवार, 17  डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. समारंभाला केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर, दीपक घैसास, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. निवडक 100 उद्योजकांना दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातून विजेत्यांची निवड केली जाणार आहे.