
कमी किमतीत आणि जुनी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे हे स्वप्न लवकरच सत्यात येऊ शकते. हिंदुस्थानात वापरलेल्या कारची विक्री करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असतो. त्यामुळे आपल्याला फारच कमी किमतीत कार विकत घेऊ शकता.
मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू कंपनी वापरलेल्या कारची विक्री करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या वेबसाईटवर जुन्या, वापरलेल्या कारची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार अतिशय कमी किंमतीत विक्रीकरिता उपलब्ध आहेत. जुन्या सुझुकी गाड्या या वेबसाईटवरील माहिती मिळवून तुम्ही विकत घेऊ शकता. याकरिता या कंपनीच्या वेबसाईटला ग्राहक संपर्क करून शकतात.
या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी वॅगन आर एलएक्स कार बोकारो, झारखंड येथील आहे. जी केवळ 35,000 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारचे मॉडेल 2006 सालातले असून या कारने आतापर्यंत 76241 किमी अंतर कापले आहे. यात पेट्रोल इंजिन आहे. ही फर्स्ट ओनर कार असून ती कार विकत घेतली तर तुम्ही त्याचे दुसरे मालक (सेकंड ओनर) असाल.
मारुती सुझुकी डिझायर व्हीडीआय कार केरळमधील मोवट्टुपुझा येथे आहे, जी केवळ 25,000 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात डिझेल इंजिन आहे. हे 2010 सालातले मॉडेल असून तिने आतापर्यंत एकूण 143826 किमी अंतर कापले आहे. तसेच कारचा मालक पाचवा असून यानंतर विकत घेणारा मालक सहावा असेल.
मारुती सुझुकी अल्टो एलएक्स ही कार सोहना, हरियाणात आहे. हे फक्त 38,000 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे 2007चे मॉडेल आहे. या कारने आतापर्यंत एकूण 112911 किमी अंतर कापले आहे. यात पेट्रोल इंजिन आहे. ही फोर्थ ओनर कार आहे.
मारुती सुझुकी मारुती 800 AC कार पाटण्यातील आहे. या कारची किंमत 45 हजार रुपये आहे. या कारचे मॉडेल 2008चे आहे. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ती आतापर्यंत 15803 किलोमीटर धावली आहे. यात पेट्रोल इंजिन असून ही पहिल्या मालकाची कार आहे.





























































