
हिंदुस्थानचे सांस्कृतिक वैभव जतन करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआर रद्द करा या मागणीसाठी 7 जानेवारी रोजी राज्यातील लेखक, संपादक, साहित्यिक, कवी, कलावंत, पत्रकार आणि वाचक आझाद मैदानात शांततापूर्ण निषेध आंदोलन करणार आहेत.
दुपारी 1 ते सायंकाळी 5 या वेळेत हे आंदोलन होणार आहे. खेळ, मुक्त शब्द, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, परिवर्तनाचा वाटसरू, आपले वाङ्मय वृत्त, अक्षर, सजग, अतिरिक्त, सेक्युलर व्हिजन, परिवर्तनाचा मुराळी, ऐसी अक्षरे, सर्वधारा, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, मराठी कवी-लेखक संघटना यांनी या आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.





























































