महामार्गावर पडला पैशांचा पाऊस, उचलायला लोकांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महामार्गावर होणारे अपघात हा खरंतर नवीन प्रकार नाही. पण, कधी कधी महामार्गावर असेही अपघात होतात, ज्यामुळे तो अपघात पाहायला येणाऱ्यांची चांदी होऊ शकते.

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया भागात असाच एक अपघात घडला आहे. एका कंटेनरमधून अचानक पैशांचा पाऊस पडल्याने तिथे नोटा उचलायला प्रचंड गर्दी झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी दक्षिण कॅलिफोर्निया भागातील फ्रीवेवर घडली.

हा कंटेनर सॅन डिएगो ते फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्प इथे जात होता. पण, वाटेत त्यातून पैशांनी भरलेल्या बॅग्ज पडल्या आणि पैसे इतस्ततः उडू लागले. मग काय, लोकांनी एकच झुंबड उडवून ते पैसे गोळा करायला सुरुवात केली. वास्तविक फ्रीवेवर गाडी अशी अचानक थांबवणं धोक्याचं असतं.

पण, लोकांनी अपघाताची पर्वा न करता गाड्या थांबवून पैसे गोळा केले. यात एक डॉलर आणि 20 डॉलरच्या नोटा होत्या. अर्थात अधिकाऱ्यांनी मिळालेले पैसे परत करण्याची विनंती केली. त्यानंतर काहींनी पैसे जमा देखील केले आहेत. पण, त्यातील बराचसा पैसा हा गेल्यात जमा आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी पैसे गोळा करून पोबारा करणाऱ्या दोघांना अटक देखील केली आहे. हा प्रकार घडल्यानंतर काही काळ हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by DEMI BAGBY (@demibagby)