स्विमिंग पूलमध्ये त्वचा टॅन होऊ शकते का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळा सुरू आहे. कडक उन्हामुळे त्वचेला त्रास होऊ नये म्हणून लोक घरातून क्वचित बाहेर पडत आहेत. वातावरण गरम झाल्यामुळे बऱ्याचजणांना उन्हाळ्याच्या निमित्ताने पाण्यात डुंबायला आवडते. स्विमिंग पूलमध्ये पोहल्यामुळे शरीराचे तापमान स्थिर राहते. त्याशिवाय व्यायामदेखील होतो. उन्हामध्ये उभे राहिल्याने त्वचा टॅन होत असते. पूलमध्ये पोहतानाही टॅनिंग होण्याची शक्यता असते. स्विमिंग पूलच्या फरशी त्वचेवर प्रकाश परावर्तित करू शकते. याने त्वचा टॅन होण्याची शक्यता असते. समुद्रामध्ये पोहताना खाऱ्या पाण्याने सूर्यप्रकाश परावर्तित होत असतो. पाण्यामुळे अतिनील किरणे सहज शरीरापर्यंत पोहचू शकतात.
थंड पाण्यामध्ये असताना सूर्याच्या किरणांमुळे होणारी जळजळ कमी होत असली तरी त्यामुळे त्वचा टॅन होऊ शकते.
त्यामुळे पाण्यामध्ये जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे महत्वाचे आहे. पाण्यामध्ये ४०-८० मिनिटांनी सनस्क्रीनचा प्रभाव कमी होत असल्याने सतत सनस्क्रीन लावणे आवश्यक असते.

सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीमध्ये पाण्यात पोहताना सूर्यकिरणांच्या संपर्कामुळे टॅनिंग व अन्य त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. पाणी हे अतिनील किरणे प्रतिबिंबित करते. यामुळे ही सूर्यकिरणे पाण्याच्या आत जाऊन त्वचेपर्यंत पोहचतात आणि त्वचा टॅन होते. किरणांच्या संपर्कात आल्यानंतर गार पाण्यामुळे त्वचेवर कोणताही परिणाम दिसत नाही. पण २४ तासांच्या आत त्वचेची जळजळ व्हायला सुरुवात होऊ शकते.

Water-resistant sunblock चा वापर करावा. पाण्यात जाण्याच्या २० मिनिटांपूर्वी ते लावावे.
उघड्या स्विमिंग पूलमध्ये पोहणे टाळा. जेणेकरून सूर्यकिरणांचा प्रभाव त्वचेवर होणार नाही.
पोहल्यानंतर सॉफ्ट बॉडी वॉश वापरा. साबण किंवा स्क्रबर वापरणे टाळा.
पोहल्यानंतर त्वचा हायड्रेट राहावी यासाठी शरीरावर मॉइश्चरायझिंग लोशन लावा.