Photo – चकाकत्या साडीत मृणालने कान्समध्ये लावली हजेरी, पाहा फोटो

कान्स फिल्म फेस्टव्हल 2023 मध्ये अनेक बी टाऊनच्या अभिनेत्री ग्लॅमरस तडका लावताना दिसत आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूरने आपल्या लूकने सर्वांना इम्प्रेस केले आहे. मृणालचे साडी नेसलेले लूक कान्समध्ये लक्षवेधक ठरले आहे.

मृणालने कान्सच्या रेड कार्पेटवर लेव्हेंडर ब्लिंग अॅम्ब्रॉडरी असलेली सा़डी नेसली होती.

मृणालने तिचे फोटो तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.

साडीमध्ये मृणाल कमालीची सुंदर दिसत असून तिचा हा ड्रेस फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांनी डिझाईन केलेली साडी नेसली आहे.

या साडीवर मृणालने तिचते केस मोकळे सोडले होते.


परदेशात मृणालया देसी लूकचा फोटो शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

फोटोंसोबत तिने फोटोकॅप्शन मध्ये तिने फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांचे आभार मानले आहेत.


फोटोकॅप्शनमध्ये फाल्गुनी शेन पीकॉक इंडियाचे या आश्चर्यकारक लूकबद्दल आणि मला देसी मुलगी असल्याचा अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद असे म्हंटले आहे. 

याआधी कान्सच्या रेड कार्पेटवरील तिच्या फर्स्ट लूकमध्ये मृणाल काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसली होती.